Ad will apear here
Next
इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांची ससूनला भेट
इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांनी ससूनमधील नवजात शिशु विभागाला भेट दिली. त्या वेळी  प्रकाश छाब्रिया, डॉ. अजय चंदनवाले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे : ‘देशासाठी नवनिर्माणाचे स्वप्न पाहणाऱ्या या लहानग्यांवर उपचार करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन करीत असलेले काम पाहून मी प्रभावित झालो आहे. आयुष्यातील पहिल्या आव्हानावर मात करण्यासाठी या चिमुकल्यांना बळ देण्याचे काम या नवजात शिशु अतिदक्षता विभागाने केले आहे. छाब्रिया कुटुंबाने घेतलेल्या जीवदानाच्या या मिशनमधील पुढाकाराचे कौतुक आहे. यापुढेही काम असेच सुरु राहावे’, असे प्रतिपादन इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने व दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सहकार्याने ससून सर्वोपचार रुग्णालयात उभारलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला डॅनियल कार्मन व सहकाऱ्यांनी मंगळवारी भेट दिली. या विभागातील सुसज्ज सुविधा, स्वच्छता आणि प्रशिक्षित डॉक्टर-नर्सेसची टीम पाहून डॅनियल कार्मन यांनी आनंद व्यक्त केला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने ससून रुग्णालयाच्या सुधारणेसाठी सुरु असलेल्या इतर कामाचीही पाहणी या वेळी डॅनियल कार्मन यांनी केली. ससूनमधील सुविधांबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या वेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुकुल माधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. आरती कानिटकर, डॉ. राजेश कुलकर्णी,  डॉ. उदय राजपूत आणि डॉ. इब्राहिम अन्सारी उपस्थित होते. फाउंडेशनतर्फे एप्रिल २०१७ पासून ५९ खाटांचे नवजात शिशु अतिदक्षता केंद्र सुरु करण्यात आले आहे. नवजात बालकांना जीवदान देण्यासाठी या केंद्राचा मोठा लाभ होत आहे. पुण्यासह आसपासच्या परिसरातून येणाऱ्या बालरूग्णांवर येथे मोफत उपचार केले जातात. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZXUBQ
Similar Posts
‘मुकुल माधव’तर्फे शौचालयांसाठी अर्थसहाय्य पुणे : रानावनात भटकंती... आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ... डोंगराळ भागात राहणारे... मुख्य प्रवाहापासून दूर असणारे... इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवही आता ‘टॉयलेट’मध्ये जाणार आहेत.
‘फिनोलेक्स’, ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांची सेवा पुणे : टाळ-मृदूंगाच्या गजरात, माऊली-माऊलीच्या जयघोषात करीत आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात पोहोचला. या वारीमार्गावर फिनोलेक्स पाइप्स व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे २३ ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.
‘धनिकांनी समाजहितासाठी पैसे खर्च करण्याची गरज’ पुणे : ‘समाजातील धनिक लोकांनी समाजहिताच्या कामासाठी पैसे खर्च केले पाहिजेत. मुकुल माधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया आणि व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया यांनी ‘सीएसआर’अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन नवजात अर्भकांसाठी दोन अतिदक्षता विभाग उभारून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. इतर धनिकांनी
‘ससूनच्या आधुनिकीकरणासाठी ‘सीएसआर’ महत्त्वपूर्ण’ पुणे : ‘ससूनसारख्या सरकारी रुग्णालयातून गरीब रुग्णांना आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निधीबरोबरच सामाजिक आणि उद्योग संस्थांच्या सीएसआरचा महत्वाचा वाटा आहे. मुकुल माधव फाउंडेशनसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन ससूनमधील आरोग्य सुविधा अधिक सक्षम कराव्यात,’ असे प्रतिपादन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language